न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०१९) :- आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन केले होते. योग प्रशिक्षक सुप्रिया बालवडे यांनी या प्रसंगी विविध आसने आयोजित केली. शिक्षक, शिक्षकइतर वर्ग आणि १५० विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी पथनाट्य आयोजित केले. प्राचार्य डॉ. एन. एस. व्यावहारे यांनी, नियमित व्यायामाचे फायदे सांगितले. डॉ. एस. वि देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. देवेंद्र शिरोडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. मयुरी ताजने, प्राजक्ता साबळे आणि स्नेहल बोराडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.















