न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- चिंचवड येथील श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात पुणे जिल्हातील शिक्षकवर्ग यांच्याकरीता ”आधुनिक शैक्षणिक विज्ञानातील महत्व (Digital India)” या विषांयावर व्याख्यान आयोजित केले होते. नाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड यांचे मार्गदर्शन सर्व शिक्षकांना लाभले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संदीप गुंड, पिं. चिं. मनपाचे माजी. शिक्षण उपसभापती नाना शिवले, विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब जाधव, विद्यालयाचे संचालक विजय जाधव, सचिव जगदीश जाधव, संचालक अमित बच्छाव, मुख्यध्यापक बाळाराम पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड यांनी शाळेतील शैक्षणिक सुविधा, आधुनिक प्रकारच्या माॅडेल प्रयोगशाळा, शैक्षणित गुणवत्ता, शाळेतील विद्यार्थ्यांची खेळातील राष्ट्रीय स्तरावरील अलौकिक कामगिरी या सर्वांची पाहणी केली व संस्थेची महाराष्ट्रातील एकमेव आदर्श माॅडेल शाळा,असे उदगार काढले.
विद्यालयाच्या वतीने अमित बच्छाव यांनी संदीप गुंड यांचा तर विजय जाधव यांनी नाना शिवले यांचा सत्कार केला. बाळाराम पाटील यांनी आभार मानले.















