- एसबीपीआयएमच्या युवोत्सव क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ फेब्रु.) :- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस.बी.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) च्या वतीने आयोजित केलेल्या युवोत्सव २०१९ या क्रिडा महोत्सवात झालेल्या फुटबॉल स्पर्धेत वाकड येथील इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲन्ड सायन्स महाविद्यालयाने तळेगाव अॅम्बीव्हॅली येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय ३ विरुध्द १ असा २ गोलने विजय मिळविला.
इंदिरा महाविद्यालयाच्या डेव्हिड आनंद, शॉन ॲरलेन्ड आणि शॉन काकडे यांनी पेनल्टी शूट आऊटवर एक गोल केला. शुभम पोटघन याने बुलेट शॉट मारुन फस्ट हाफच्या अठराव्या मिनिटाला एक गोल केला. तर डी. वाय. पाटीलच्या रोहित कुमारने सेकंड हापला बाराव्या मिनिटाला फ्रि कीक वर गोल केला.
आकुर्डीतील पीसीईटीच्या कॅम्पस्मध्ये सुरु असलेल्या युवोत्सव २०१९ या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस उपायुक्त रामचंद्र जाधव, पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनिअल पेनकर, डॉ. किर्ती धारवाडकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत फुटबॉलसाठी बस्तीस महाविद्यालयीन संघांनी तर बास्केट बॉलमध्ये सोळा संघांनी सहभाग घेतला आहे.
बी. जी. घोलप महाविद्यालय वि. वि. डी. वाय. पाटील महाविद्यालय पिंपरी (२ विरुध्द ३), डी. वाय. पाटील कला, वाणिज्य महाविद्यालय (अ) वि.वि. इंड्स बिजनेस स्कूल (५ विरुध्द २), पीसीसीओई (अ) वि.वि. इंदिरा कॉलेज ऑफ मेनेजमेंट (१ विरुध्द ०), डी. वाय. पाटील इंजिनिअरींग आकुर्डी वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (१ विरुध्द ०), एआयएसएसएमएसटी वि. वि. बी. व्हि. पी. (१ विरुध्द ०), पीसीपी वि. वि. एनएमआयईटी (३ विरुध्द २), मॉर्डन महाविद्यालय वि. वि. बालाजी इन्स्टिटयूट (२ विरुध्द ०), आयसीसीएससी वि.वि. ॲम्ब्रोसिया महाविद्यालय बावधन (५ विरुध्द ०),
या महोत्सवाचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई एसबीपीआयएमचे संचालक डॉ. डॅनिअल पेनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शुक्रवारी (दि. ८ फेब्रुवारी) पीसीईटी आकुर्डी कॅम्पस मध्ये दुपारी होणार आहे.











