न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रु.) :- जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका हर्षा बाठिया, गीता येरुणकर, तेजल कोळसे पाटील, मधु दाणी, रिंकू शिंगवी, प्रिया मेनन, श्रद्धा देशमुख, नीलिमा नायडू आदींसह शिक्षकवृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरती राव यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे घडले, त्यांचे कार्य यांचे महत्त्व आणि जीवनकार्य उलगडून सांगितले. हर्षा बाठिया यांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे पालन करणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या राजदरबारातील अष्टप्रधान मंडळाचे सादरीकरण केले. अष्टप्रधान मंडळाच्या कार्यशैलीवर विद्यार्थ्यांनी या माध्यमातून प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी पोवाडे गायले, तसेच पाळणाही म्हटला. मुख्याध्यापिका गीता येरुणकर, विशाखा भगत, मनिषा पुराणिक, आशा घोरपडे यांनीही विद्यार्थ्यांना शिवजयंती साजरी तर कराच, पण त्यांनी केलेले कार्य अमलातही आणावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘राजे पुन्हा जन्माला या’, हे नाटक; तसेच पोवाडा, शिवजन्मोत्सव आदी कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक नीता भिसे यांनी; तर सूत्रसंचालन स्मिता बर्गे, धारा राजपुरोहित, अनिशा धारगावे यांनी केले.











