- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन
- केपीआयटी स्पार्कल मध्ये वीस लाखांहून जास्त बक्षिसांचे होणार वाटप
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रु.) :- माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी उत्पादन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी केपीआयटी आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) यांच्या सयुंक्त विद्यमाने केपीआयटी स्पार्कल 2019 या नाविन्यपूर्ण कल्पना सादरीकरण स्पर्धेची अंतिम फेरी पीसीसीओई मध्ये शनिवारी व रविवारी (दि.23 व 24 फेब्रुवारी) आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केपीआयटी कंपनीचे उपाध्यक्ष राहुल उपलप, पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी व पीसीसीओईचे प्राचार्य डॉ. ए.एम. फुलंबरकर यांनी गुरुवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
केपीआयटी स्पार्कल 2019 या स्पर्धेत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, नीती आयोग, अटल इंनोव्हेशन मिशन, एआयसीटीई (AICTE), इंडिया डिजाईन कौन्सिल, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ डिजाईन, पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) यांचा सहभाग आहे.
या वर्षाचा विषय ‘ऊर्जा आणि गतीशिलतेचे भवितव्य’ (एनर्जी ॲन्ड मोबिलिटी फॉर फ्युचर) असा आहे. शनिवारी (दि. 23 फेब्रुवारी) सकाळी 9 वाजता उद्घाटनाच्या सत्रात इन्स्टिटयूट ऑफ फुचर ट्रान्सपोर्ट अँड सिटीजचे संचालक डॉ. कार्ल पेरीन, ऑडी कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. पीटर आणि बेंगलोर येथील सिपीडीएम, आयआयएससीचे चेअरमन डॉ. अमरेश चक्रवर्ती हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच समारोप व बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. 24 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे (CSIR) संचालक डॉ. शेखर मांडे, निती आयोगाचे पद्मभूषण डॉ. वि. के. सारस्वत, अटल इंनोव्हेशन मिशनचे प्रमुख डॉ. उन्नत पंडित आणि एआयसीटीचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेतील उत्कृष्ठ प्रकल्पाला प्लॅटिनम दहा लाख रुपय, गोल्ड पाच लाख रुपये, सिल्वर दोन बक्षिसे अडीच लाख रुपये आणि एक कान्स एक लाख रुपये अशी बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.
केपीआयटी हि ऑटोमोटिव्ह आणि ऊर्जा (एनर्जी) क्षेत्रातील एक नामांकित कंपनी असून आतापर्यंत सुरक्षित वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहन संबंधित नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात केपीआयटीचे योगदान आहे. तसेच पीसीसीओई एक नामांकित अभियांत्रिकी शिक्षण देणारे, विद्यार्थ्यांचा तांत्रिक तसेच सर्वांगिण मौलिक विकास केंद्रबिंदू मानुन मूबलक प्रात्यक्षिकांसह व्यावसायिक शिक्षण देणारे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. ‘केपीआयटी स्पार्कल 2019’ हि एक राष्ट्रीय स्तरावरील नाविन्यपूर्ण कल्पना व त्यावरील प्रत्यक्ष प्रकल्प सादरीकरणाची स्पर्धा असून दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर अभियांत्रिकी आणि विज्ञानाचा विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या स्पर्धा आयोजित करते.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश समाजउपयोगी संशोधन करून ते समाजाच्या हितासाठी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे हा आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 26 राज्यातून 22000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 2000 पेक्षा जास्त प्रकल्प प्राप्त झाले. त्यांचे अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रातील अनुभवी परीक्षकांनी परीक्षण करून त्यातून 30 प्रकल्प अंतिम फेरीसाठी निवडले आहेत. त्यांची स्पर्धा व सादरीकरण रविवारी (दि. 24 फेब्रुवारी) करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आहेत.
विश्वस्त भाईजान काझी, प्राचार्य डॉ. अ म फुलंबरकर, समन्वयक केपीआयटी प्रा. राहुल पाटील, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे, केपीआयटी सहउपाध्यक्ष राहुल उपलप यांनी आवाहन केले आहे की, हि स्पर्धा सर्व विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी खुली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.











