न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ एप्रिल) :- पुणे गोल्फ क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरीय गोल्फ टूर्नामेंटमध्ये सी. जे फ्रांसिस, पंकज शर्मा, सिध्दार्थ कुलकर्णी, सचिन बायोसिया यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे गोल्फ क्लबचे कप्तान स्वस्तिक शिरसेकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आले. पुणे क्लब येथे पीजीटीआय- प्रो आर्म्स टूर्नामेंट आयोजित केली होती. सहभागी झालेल्या स्पर्धकांना क्रिस्टल बाटलीची प्रतिकृती व बॅग भेट देण्यात आली. या स्पर्धेत देशभरातून ८० खेळाडू सहभागी झाले होते.











