न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- अचानक समोर गाडी थांबवल्याचा जाब विचारल्याने कारमधून आलेल्या दोघांनी मारहाण करीत तरुणावर धारदार शस्त्रांनी वार केले. ही घटना सोमवारी (दि. १) रोजी रात्री अकराच्या सुमारास चिंचवड येथील वाल्हेकरवाडी रोड येथे घडली.
या प्रकरणी सुनील कृष्णा कांबळे (२८, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) याने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी कांबळे व त्यांचा मित्र निखिल पाटील हे दुचाकीवरून घरी येत असताना आरोपींनी त्यांची कार अचानक फिर्यादीच्या दुचाकीसमोर थांबविली.
त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. कांबळे यांनी कार चालकाला गाडी थांबवल्याचा जाब विचारला असता दोघांनी त्यांना मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करून कांबळे यांस जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक झंडे करीत आहेत.
















