न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०१९) :- दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानातील ४९ हजार रुपयांचे मोबाईल चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (दि. २) रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी विजय कृष्णा सोनी (३१, रा. भारतमाता नगर, दिघी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्यात दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विजय यांचे भोसरी येथील हनुमाननगर परिसरात ‘शुभम मोबाईल शॉपी’ नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर चोरट्यांनी कशाच्या तरी सहायाने दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ४९ हजार रुपयांचे ७ माबाईल फोन चोरून नेले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.
















